Pune Crime: पुण्यात सोसायटीतील जिमवरून वाद, चौघांमध्ये फ्रिस्टाईल मारामारी, एकाला अटक
Fighting Video

Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्च भ्रू सोसायटीतील जिममध्ये किरकोळ गोष्टीवरून भांडण सुरु झालं आणि ते टोकाला पोहचले आहे. जिममध्ये झालेलं भांडणामुळे एकाला पोलिसांनी अटक केले आहे. या भांडणात तीन ते चार जणांनी फ्रिस्टाईल मारामारी केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे या भांडणात एका व्यक्तीने डोळा गमावला आहे. (हेही वाचा- मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेचा पोलिसांवर आणि स्थानिकांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार,  संदीप अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीने सोसायटीच्या जिमला गेले होते तेव्हा जिथे रुपेश चव्हाण यांनी त्यांच्या प्रवेशावर आक्षेप घेतला होता, ते जिमचे सदस्य नसल्याचा आरोप करत होते आणि ही सुविधा ए विंग आणि बी विंगमधील रहिवाशांसाठी नव्हती या क्षुल्लक गोष्टीवर भांडण सुरु झालं, त्यानंतर वादविवादानंतर चौघांमध्ये मारामारी झाली. एकाने संदीप अग्रवाल यांच्यावर हल्ला केला. रुपेश चव्हाण यांनी पीडितेच्या डोळ्याला एका वस्तूने मारले आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला. श्वेता संदीप अग्रवाल यांनी रुपेश चव्हाण (35), सागर सेजूल (37), राजू बिंद्रा (40) आणि समीउल (35) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. रुपेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे, आणि संदीप अग्रवाल यांना डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे, परिणामी दृष्टी कमी झाली आहे.