Pune: माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीची आत्महत्या
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

पुणे (Pune) जिल्ह्यातील काँग्रेस (Pune Congres) पक्षाच्या स्थानिक नेत्या आणि माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत ( Nita Rajput Jayant-Rajput) यांचे पती जयंत रजपूत यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. जयंत रजपूत (Jayant Rajput) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास आढळला. त्यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. जयंत राजपूत यांच्या मृत्यूची डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयंत रजपूत यांचे पुणे येथील लॉ कॉलेज रस्त्यावर असलेल्या कांचन गल्ली येथे कार्यालय आहे. ते स्वत: व्यावसायीक होते. बारामती येथे त्यांची औषध कंपनी आहे. सुरुवातीला जयंत यांच्या मृत्यूबाबात कोणाला माहिती नव्हीत. मात्र, त्यांचा मुलगा जेव्हा ऑफिसमध्ये गेला तेव्हा जयंत रजपूत यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. वडिलांचा मृतदेह पाहून धक्का बसलेल्या त्यांच्या मुलाने डेक्कन पोलिसांना माहिती दिली.

डेक्कन पोलीस प्राप्त माहितीवरुन घटनास्थली दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. जयंत रजपूत यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Keshubhai Patel Passes Away: गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

दरम्यान, जयंत रजपूत यांनी नेमकी कोणत्या कारणास्त आत्महत्या केली याचे ठोस कारण अद्याप पुढे येऊ शकले नाही. रजपूत यांच्यावर कोणता दबाव होता का, त्यांना काही त्रास होता का याबाबही तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.