पुणे शहराची शान म्हणून ओळखले जाणारे वाडे आता शेकडो वर्षांना पार करून गेले आहेत, त्यामुळे याठिकाणी सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. वाड्यांची पडझड होऊन कधी कोणता भाग कोसळला तर रहिवाशांचा जीव संकटात येऊ शकतो. असाच पुण्यातील बुधवार पेठेत 100 वर्षांपासून उभा असणारा सिंगालिया वाडा (Singaliya Wada). आज, 1 मार्च रोजी या वाड्याचा जवळपास 70 ते 75 टक्के भाग कोसळून भीषण अपघात झाला. यावेळी कोसळलेल्या वाड्याखाली एका वृद्ध महिलेसह दोन तरुण अडकून पडले होते, मात्र अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेने या तिघांनाही वाचवण्यात यश आले आहे. सुदैवाने यातिघांना सुद्धा गंभीर दुखापत झालेली नाही.
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात 90 ते 100 वर्षे जुना सिंगालिया वाडा आहे. सकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली त्यांनतर स्थानिकांनी अग्निशमन दलाल माहिती देऊन पाचारण केले, लगेचच हा ढिगारा उपसून काढण्याचे काम सुरु झाले आणि मग या ढिगाऱ्याखालून गंगुबाई कल्याणी (वय 70 ) आणि विनायक कल्याणी (वय 48) यांना वाचवण्यात आले. या दोघांना झालेल्या किरकोळ दुखापतीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई : किंग्स सर्कल परिसरात भरधाव गाडीच्या धडकेत FOB चा 'हाईट बॅरिअर' निखळला; दिवसभर वाहतूक कोंडी
दरम्यान, यावेळी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरीही अशा जुन्या वाड्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजी बाबाबत निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. तसेच या धोकादायक वास्तूंमध्ये राहण्याला परवानगीच कशी दिली जाते असाही सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.