Pune Bhidewada (Imgae Credit - ANI Twitter)

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातील मुलींची पहिली शाळा जिथे सुरू केली तो पुण्यातील (Pune News) भिडेवाडा (Bhide Wada) आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला आहे. गेल्याच महिन्यात भाडेकरूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती आणि भिडे वाडा पुणे महापालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयानंतर मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे मनपाने (PMC) ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला आणि वाडा जमिनदोस्त केला. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल. (हेही वचा - Mahaparinirvan Din 2023: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येणाऱ्या अनुयायांसाठी अनेक सुविधा; विशेष रेल्वे सेवा, तात्पुरता निवारा, शामियाना, भोजनाची सोय, जाणून घ्या सविस्तर)

पाहा व्हिडिओ -

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातील बुधवार पेठ येथील तात्याराव भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील याचिका फेटाळली. 13 वर्षे या स्मारकासाठी न्यायालयीन संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करून याचिका करतांना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न केला. एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा, असा आदेश दिला. तसेच असे न केल्यास महापालिका जबरदस्तीने भूसंपादन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या पुणे महानगरपालिकेच्या मालकीचे असून मिळकतीवर कोणतेही अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई जाईल अशी नोटीस महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून या ठिकाणी लावण्यात आली आहे.