पुणे: Bank Of Maharashtra च्या आर्थिक स्थिती बाबतच्या बातम्या अफवा; बॅंकेने दाखल केली  सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार
Bank of Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

पीएमसी बॅंक (PMC Bank) आर्थिक घोटाळ्यानंतर अनेक को ऑपरेटिव्ह बॅंक बंद होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. यामध्ये आता 'बॅंक ऑफ महाराष्ट्र' (Bank Of Maharashtra)  बंद होणार असे काही मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. मात्र काल 'बॅंक ऑफ इंडिया'ने ट्विटर अकाऊंटवरून बॅंकेसंबंधित खोटे मेसेज पसरवत असल्याचं सांगत या प्रकरणी सायाबर गुन्हे शाखेकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्रने काल (18 ऑक्टोबर) दिवशी सायबर गुन्हे शाखेकडे अर्ज दाखल केला आहे. या तक्रारीमध्ये काही जणांची नावं देण्यात आली आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्र कडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये बॅंकेची आर्थिक स्थिती उत्तम असून काही खोटी वृत्त पसरवली जात आहेत असं स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे बॅंकेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मागील महिन्याभरापासून मुंबईत पीएमसी बॅंक खातेदारांचे पैसे अडकले आहेत. सध्या पीएमसी बॅंक खातेदार सहा महिन्यांसाठी 40,000 रूपये काढू शकतात. तर या प्रकरणी माजी संचालकांसह 5 जणांना अटक झाली आहे.

राकेश व सारंग वाधवान, बँकेचे माजी संचालक वरयाम सिंग या तिघांची महानगर दंडाधिकारी एस. जी. शेख यांनी 23ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडीत रवानगी केली. वाधवान पिता-पुत्राला ३ ऑक्टोबर रोजी तर वरयाम सिंग यांना 5 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.