Accident (PC - File Photo)

Pune Accident: रस्ते अपघाताची मालिका काही संपेना. पुण्यातील नवले पूल हा अपघाताचा स्पॉट बनला आहे. मुंबईत काल वरळी सी लिंकवर अपघात झाल्या ही घटना ताजी असताना पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दरी पुलावर वाहनांच्या धडकेत मोठा अपघात झाला. चार वाहनांची एकमेकांना धडक लागल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या कंटेनरची लक्झऱी बस, टेम्पो आणि कारची धडक झाली आहे. घटनास्थळीची माहिती मिळताच पुणे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अपघात स्थळी अग्निशमन दलाची चार वाहने दाखल झाली असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवले पूलावर हा अपघात पहाटे पावणे चारच्या दरम्यान झाला.  या अपघाताची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल अपघात स्थळी दाखल झाले. दोन दण जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सातऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा कंटनेर समोरच्या टेम्पोला जाऊन धडकला. त्यानंतर डिव्हायरल तोडून समोरच्या लेनवर पलटी झाला. बाजूच्या रस्त्यावरील साताराच्या दिशेने निघालेल्या बसला देखील कंटेनची जोरदार धडक बसली. या अपघात दोघांना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघात झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले. जवांनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले. दोन जण अपघातात अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आले. रस्त्यावर बराच वेळ वाहतुक सेवा विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतुक सेवा सुरळीत करण्यात आली.