प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) शहरामध्ये बाईक टॅक्सी (Bike Taxi) सुरू असल्याने त्याच्या निषेधार्थ आता रिक्षा संघटना आक्रमक झाल्या आहेत. शहरातील बाईक टॅक्सीच्या विरोधात रिक्षा संघटनांनी बेमुदत बंदाची हाक दिली आहे. 28 नोव्हेंबरपासून या बेमुदत ऑटो रिक्षा बंदला सुरूवात होणार आहे. पुणे शहरातील बाईक टॅक्सी बंद व्हावी अशी त्यांची मागणी आहे.

पुणे शहरामध्ये 28 नोव्हेंबर पासूनच्या संपामध्ये एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत. तर 50-60 हजार रिक्षाचालकही सहभागी होणार आहेत. ‘बघतोय रिक्षावाला संघटनेने’  हा संप पुकारला आहे. अनेकदा निवेदनं करूनही सरकार आपल्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याच सांगत आता त्यांनी संपाची हाक दिली आहे. आपल्या मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत रिक्षा सुरू करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकार मध्ये अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांना 8 दिवसांत बाईक टॅक्सी बंद करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही पुण्यात बाईक टॅक्सी सुरूच असल्याने आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई न केल्याने आता पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये रिक्षा चालक पुन्हा आक्रमक होत त्यांनी संपाचं हत्यार हाती घेतलं आहे. नक्की वाचा: Water Cut In Pune: दुरुस्तीच्या कामांमुळे गुरूवारी पुण्यातील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद .

बाईक टॅक्सी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील सर्वात धोकादायक प्रवास पद्धती असून, रिक्षा चालकांप्रमाणे, त्यांना कायद्याचे बंधन नाही आणि वाहतूक विभागाकडे रिक्षाप्रमाणे त्यांना कर भरावा लागत नाही.