एनसीपी (National Congress Party) पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षाला रविवार 12 फेब्रुवारी दिवशी पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याच्यावर एका वकील महिलेवर विनयभंग (Molestation) झाल्याचे आरोप केले आहेत. 25 वर्षीय महिलेने चतुश्रृंगी पोलिस स्टेशन (Chatushrungi Police Station) मध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजकीय नेते, त्यांच्या पत्नी आणि 4 अन्य यांच्याविरूद्ध आयपीसी 354, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीत महिलेने 13 फेब्रुवारी दिवशी गुन्हा दाखल केला आहे. रात्री 8.40 च्या सुमारास ओव्हर हॉन्किग वरून वाद झाला. त्यानंतर महिलेसोबत गैरवर्तन झाले आणि तिचा विनयभंग झाला. अशी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल झाली असल्याची माहिती चतुश्रृंगी पोलिसांनी दिली आहे. नक्की वाचा: Pune: शारीरिक प्रशिक्षणादरम्यान 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक अटकेत.
पीडीतेच्या दाव्यानुसार, तिने प्रतिकार करण्ण्याचा प्रयत्न केला परंतू आरोपीच्या पत्नीने तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. आरोपीसोबत उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी शिवीगाळ केली आहे.