सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Photo credit: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. शिर्डी येथे त्यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमिवर सामाजिक कार्यकर्त्यात तृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून तब्यात घेतले. तृप्ती देसाई या शिर्डीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होत्या. मोदींची भेट झाली नाही तर, आपण आंदोलन करु असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्या पंतप्रधान मोदींना भेटणार होत्या.

दरम्यान, पोलीस अधिक्षकांना गुरुवारी दिलेल्या पत्रात तृप्ती देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची मागणी केली होती. ही भेट होऊ शकली नाही तर, आपण मोदींचा ताफा रोखू असा इशाराही त्यांनी या पत्रात दिला होता. या पत्राची दखल घेतल पोलिसांनी देसाई यांना गुरुवारी सकाळी पुण्यातून ताब्यात घेतले.

दरम्यान, आम्ही शिर्डीला जाणार होतो. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. पोलीसांचे हे वागणे चुकीचे असून, आंदोलन करणे आमचा हक्क आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तृत्पी देसाई यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी कायमचे उघडण्यात आले. मात्र, अद्यापही महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होत आहे. भगवान अयप्पांच्या भक्ताकडून महिलांना मारहाणही करण्यात आली आहे. या प्रकाराचा जाब विचारण्यासाटी तृत्पी देसाई पंतप्रधानांना भेटणार होत्या.