Pune: अश्लील मेसेज पाठवून  ब्युटी पार्लर मधील महिलेला त्रास देणाऱ्या आरोपीस अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचा पाठलाग  केल्याप्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथून समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या घरमालकाविरुद्ध देखील लैगिंक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाठलाग करणारा व्यक्ती आणि ब्युटी पार्लरमधील महिला हे एकाच घरमालकाचे भाडोत्री होते.  (Wife Killed Husband: पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैगिंक छळ करणे पतीच्या जीवावर बेतले; पुणे येथील धक्कादायक घटना)

अटक झालेल्या व्यक्तीने घरमालकाकडून या ब्युटी पार्लरमधील महिलेचा नंबर घेतला. त्यानंतर त्याने सोशल मीडिया साईट्सवरुन महिलेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर त्याने तिला फोन करुन प्रत्यक्ष भेटण्यास सांगितले आणि पार्टीसाठी घेऊन जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली, अशी माहिती हडपसर पोलिस स्टेशन सब इन्स्पेक्टर शिवाजी जाधव यांनी दिली. (Pune: मुख्यध्यापकाचे विद्यार्थीनीसोबत संतापजनक कृत्य, पुण्यातील राजगुरूनगर येथील घटना)

वारंवार येणाऱ्या मेसेजेस आणि कॉलला वेैतागून महिलेने आरोपीला भेटण्याचा आणि जाब विचारण्याचा निर्णय घेतला. आरोपीला भेटताना ती एका मैत्रिणीला सोबत घेऊन गेली. महिलेने आरोपीला आपल्यापासून दूर राहण्यास सांगितले. त्यावेळेस याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली. यानंतर पीडित महिलेने लैंगिक छळ, पाठलाग आणि इतर आयपीसी कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. दरम्यान, आजकाल अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहेत. मात्र पुढे येऊन याविरुद्ध तक्रार दाखल करणे अत्यंत गरजचे आहे.