Accident (PC - File Photo)

Pune Accident News: पुण्यातील लोणी काळभोर येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी पळवून नेताना ट्रकचा अपघात झाला. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमविवाह करण्यासाठी तरुणाने तरुणीला ट्रकमध्ये बसवून पळवून नेत असताना लोणी काळभोर येथील शिंदवणे घाटात ट्रक उलटला. या अपघातात प्रियकराचा प्रेयसीसमोर दुर्दैवी मृत्यू झाला आणि प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. सद्या तिच्यावर रुग्णालयत उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  प्रेयसी ही मुळची सांगली जिल्ह्यातील मिरज येथील रहिवासी आहे. अपघातात रामेश्वर लक्ष्मण शिंदे (२१ मानवद) असं मृत्यूमुखी पडलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील परतूड येथील रहिवासी होता. पोलिसांनी अपघातस्थळी दाखल होऊन तपासणी सुरु केली. तरुणीचे लग्न झाले होते तीच्या नवऱ्या सोबत भांडण झाले असल्यामुळे तरुणी माहेरी आली होती. ट्रकचालक रामेश्वर आणि  तरुणी हे दोघे एकमेकांवर प्रेम करत होते अशी माहिती मिळाली,

दोघेही आंतरजातिय असल्यामुळे लग्नासाठी घरातून सगळ्यांनी विरोध केला दरम्यान दोघांनी लग्नासाठी पळून जायचं ठरवले, दरम्यान तरुणाने तरुणीच्या वडिलाचा ट्रक घेऊन फरार झाले. घरच्यांनी दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार मिरज पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान शिंदवणे घाटात ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात दोघे ही गंभीर जखमी झाला. तरुणाला जास्त दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी दाखल झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.