नवी मुंबई: खारघर येथील 'लकी तवा' रेस्टोरन्टमध्ये 'पाकिस्तान मुर्दाबाद' म्हटल्यास एकूण बिलावर 10% सूट (Viral Video)
Kharghar Lucky Tawa Restaurant offer 10% discount on bill for customer saying 'Pakistan Murdabad' | (Photo Credit: Youtube)

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातील नागरिक आपला आक्रोश, रोष विविध माध्यमातून व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर (Kharghar) येथील 'लकी तवा' (Lucky Tawa) रेस्टोरन्टने एक खास ऑफर सुरु केली आहे. या हॉटेलचे बिल चुकते करण्यापूर्वी तुम्ही जर 'पाकिस्तान मुर्दाबाद' असे म्हणालात तर तुम्हाला एकूण बिलावर 10% सूट मिळणार आहे. या रेस्टोरन्टमधील एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या रेस्टोरन्टचे मालक सय्यद खान हे मुस्लिम असून देशावरील प्रेमाखातर आणि हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी ही खास ऑफर सुरु केली आहे. तसंच या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही सूट अजून आठवडाभर सुरु राहणार आहे.

जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 पेक्षा अधिक भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा निषेध नोंदवत शहीद कुटुंबांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत.