जानेवारी महिन्याच्या अखेरीस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचारी संघटनांनी मार्च महिन्यात तीन दिवसाचा संप पुकारला होता. हा संप 11-13 मार्च दरम्यान पुकारण्यात आला होता. वेतनवाढीसह अन्य विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. पण सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा केल्यानंतर हा संप तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोशियनने बाबत अधिक माहिती दिली आहे. तर मार्च महिन्यात 9 आणि 10 मार्च दरम्यान होळी साजरी केली जाणार आहे. मात्र संपाला स्थगिती दिल्याने नागरिकांना बँकांची शिल्लक राहिलेली कामे करता येणार आहे.
सरकारी बँकांच्या युनियन बँक एंप्लॉयी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एंप्लॉयी असोसिएशन (AIBEA) यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 11 मार्च ते 13 मार्च रोजी देशव्यापी संप पुकारला होता. परंतु कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भुमिका घेण्यात आल्याने हा तीन दिवसांचा संप मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर 8 मार्च रोजी रविवार आहे. त्यानंतर 9 मार्च आणि 10 मार्च रोजी होळी आणि रंगपंचमीनिमित्त राज्यातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र 9 मार्च रोजी होळीच्या राज्यात सुट्टी नाही. त्यामुळे एक दिवस बँका सुरू राहणार आहेत.(भारतीय बँका सुरक्षित, अफवांना बळी पडू नका; RBI ने केले नागरिकांना आवाहन)