पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सकळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat Live Streaming) या कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. रेडीओ कार्यक्रमाचा हा 89 वा भाग आहे. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाधयमांनी दिलेल्या वृत्तानुसा पंतप्रधान आज या कार्यक्रमात अमरोहा येथील ढोलक व्यवसायिकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनच्या सर्व नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज वेबसाईट आणि ऑन एअर मोबाील अॅपवरही हा कार्यक्रम प्रसारीत होईल. कार्यक्रम एआयआर न्यूज, डीडी न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 ऑक्टोबर 2014 पासून या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. या कार्यक्रमाचा उद्देश होता की, जनतेचे मुद्दे आणि प्रशासन यांच्यात संवाद स्थापन करणे. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा, लता मंगेशकर यांच्यासारखे प्रसिद्ध लोकही या कार्यक्रमात काही काळ पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. (हेही वाचा, Gadchiroli Accident: 'मन की बात' जिल्हा समन्वयक भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू; गडचिरोली येथील घटना)
ट्विट
Prime Minister @narendramodi to share his thoughts in 89th episode of '#MannKiBaat' programme on All India Radio.#PMonAIR pic.twitter.com/lSaLzQ3Rqa
— All India Radio News (@airnewsalerts) May 29, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' कार्यक्रमाचा 89 व्या भागाबद्दल म्हटले की, या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या सूचना मिळाल्या होत्या. त्यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, लोकांनी, खास करुन युवकांनी मोठ्या प्रमाणावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी पाठिमागील महिन्यात एक बुकलेट सुद्धा शेअर केले होते. त्यामध्ये विविध आर्टिकल्सचा समावेश होता. पाठिमागच्या मनकी बात कार्यक्रमात पंतप्रधानांनी डिजिटल इकॉनॉमी आणि म्यूजियमवर चर्चा केली.