
Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज (बुधवारी) रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गिकेचे उद्घाटन (Pune Metro inauguration) होणार आहे. पंतप्रधान मोदी हे ऑनलाईनपद्धतीने या मार्गिकेचे उद्घाटन करतील. मागील काही दिवसांपासून पुणेकर या मार्गिकेच्या उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होते. अखेर आज त्यांची प्रतिक्षा संपली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोची (Pune Metro) ही दुसरी मार्गीका दुपारपासून नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. सकाळी 11.30 वाजता कोलकाता येथून पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मार्गाचे उद्घाटन करतील. हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रुबी हॉल ते रामवाडी इथून मेट्रो धावेल, अशी माहिती पुणे मेट्रोचे संचालक अतूल गाडगीळ यांनी दिली. हेही वाचा : Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांना दिलासा! आता 8 मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होणार पार्किंगची जागा; जाणून घ्या ठिकाणे व दर
तर, उद्घाटनानंतर दोन तासांनी प्रवासी सेवा सुरू होईल, अशी माहिती पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली. दुपारी एकच्या सुमारास रुबी हॉलपासून मेट्रो रामवाडीकडे रवाना होईल. रुबी हॉल ते रामवाडी हे अंतर साडेपाच किलोमीटर आहे. पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर मोदी यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या पुणे मेट्रो मार्ग-1 कॉरिडॉरच्या निगडी विस्तारित भागाच्या कामाचे उद्घाटन पार पडणार आहे. 'पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे,' असे अतूल गाडगीळ यांनी सांगितले. हेही वाचा : Pune Metro चं देखील तिकीट आता मिळणार WhatsApp वर; पहा कसा कराल बूक?
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोच्या कामात झालेल्या दिरंगाईमुळे मधल्या काळात पुणे मेट्रो वेगवेगळ्या कारणावरुन चर्चेत होती. मार्गाचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले होते. मेट्रोचे ट्रायलदेखील पार पडले होते. तरीही ही मार्गिका मेट्रो प्रशासनाकडून सुरु करण्यात आली नव्हती. त्याशिवाय, या आधीच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या पुणे मेट्रोच्या नव्या मार्गीकेचे उद्घाटन नियोजित होते. मात्र, तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला होता. त्यांनी थेट मेट्रो कार्यलयाला घेराव घातला होता.