Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांना दिलासा! आता 8 मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होणार पार्किंगची जागा; जाणून घ्या ठिकाणे व दर

बूम बॅरियर्स, काँक्रीट फ्लोअरिंग, लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुविधा देणारी ही पार्किंग सुविधा लवकरच लोकांसाठी खुली केली जाईल.

Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांना दिलासा! आता 8 मेट्रो स्थानकांवर उपलब्ध होणार पार्किंगची जागा; जाणून घ्या ठिकाणे व दर
Parking Spaces At Pune Metro Stations

Parking Spaces At Pune Metro Stations: पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC), संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, स्वारगेट, आयडियल कॉलनी आणि मंगळवार पेठ/आरटीओसह आठ पुणे मेट्रो स्थानकांवर आता पार्किंगची जागा उपलब्ध होणार आहे. या पार्किंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी अशा दोन्ही गाड्या पार्क होऊ शकतात. पार्किंग सुविधेचे व्यवस्थापन आणि ऑपरेशनल बाबींवर नियुक्त एजन्सीद्वारे दैनंदिन आधारावर देखरेख केली जाणार आहे. बूम बॅरियर्स, काँक्रीट फ्लोअरिंग, लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुविधा देणारी ही पार्किंग सुविधा लवकरच लोकांसाठी खुली केली जाईल. याशिवाय, ॲप-सक्षम पार्किंग बुकिंग आणि पार्किंग ऑक्युपन्सी डिस्प्ले माहिती फलक सोयीसाठी प्रदान केले आहेत. मेट्रोच्या कामकाजाच्या वेळेत हे पार्किंग उपलब्ध असेल. लाइन-1 (पर्पल लाईन) आणि लाईन-2 (अक्वा लाईन) वरील सेवांसाठी पुणे मेट्रोने त्याच दिवशी जारी केलेले वैध मेट्रो तिकीट धारण करणाऱ्या वापरकर्त्यांना, संबंधित मेट्रो स्टेशनवर पार्किंगमध्ये 25% सवलत मिळेल. वैध मेट्रो प्रवास पास असलेल्या वापरकर्त्यांसाठी मासिक पार्किंग सदस्यता पास देखील उपलब्ध आहेत. शिवाय, पार्किंगच्या जागेत हेल्मेट ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी 24 तासांसाठी 5 रुपये नाममात्र शुल्क लागू आहे. (हेही वाचा: Shivneri Festival 2024: शिवनेरी येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा'चे आयोजन; संगीत, नृत्य, नाट्य, गिर्यारोहणसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर)

पहा ठिकाणे व दर - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2024 12:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).