मुख्यमंत्र्यांच्या क्रमवारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या 5 मध्ये असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब- बाळासाहेब थोरात
Uddhav Thackeray And Balasaheb Thorat (Photo Credit: Facebook)

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची लोकप्रियता 76.52 टक्के असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहेत. याबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतूक केले आहे. तसेच मुख्यमंत्र्याच्या क्रमवारीत आपले मुख्यमंत्री पहिल्या 5 मध्ये असणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच राज्यात करोनाचे संकट ओढावले आहे. या कठिण परिस्थीतही कोरोनासारख्या महामारीचा सामना करणाऱ्या ठाकरे सरकारच्या कामाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. त्या खालोखाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आहेत. तर तिसऱ्या स्थानावर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी वियजन आहेत. चौथ्या स्थानावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आहेत. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या यादीच पाचवे स्थान पटकावले आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. हे देखील वाचा- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी; अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा

ट्वीट-

आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. 66.20 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर 23.21 टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचे म्हटले आहे. याच सर्वेक्षणामध्ये देशातील मुख्यमंत्र्यासंदर्भातही काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामाध्यमातून राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.