commercial LPG gas cylinders

घरगुती गॅस सिलेंडर (Domestic Gas Cylinder) नंतर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर्सची (Commercial Gas Cylinder) देखील किंमत कमी झाली आहे. ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरीस मोदी सरकारनं रक्षाबंधनांचं गिफ्ट म्हणून महिलांना घरगुती गॅस सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये 200 रूपयांची कपात जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची देखील दरकपात जाहीर करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे.

मुंबई मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर्सची किंमत मागील 2 महिन्यात 251 रूपयांनी कमी झाली आहे. जुलै मध्ये त्याचा दर 1733 होता. ऐन सणासुदीच्या काळात हे दर कमी करण्यात आले आहे. 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 100 रूपयांपेक्षा अधिक कपात झाल्याने त्याचे दर 1482 रूपयांच्या जवळ पोहचले आहेत. LPG Cylinder Price Cut: एलपीजी गॅस सिलिंडर दरात 200 रुपयांची कपात, उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार देणार अनुदान .

व्यावसायिक LPG गॅसचे नवीन दर

दिल्ली ---- 1522.50 रुपये

कोलकाता--- 1636 रुपये

मुंबई--- 1482 रुपये

चेन्नई--- 1695 रुपये

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर 1 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. मोदी सरकारच्या घरागुती गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये कपात झाल्याने 10 कोटी लाभार्थ्यांना 200 रुपये अनुदान आधीच दिले जात आहे. यानंतर त्यांना मिळणारा फायदा 400 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना 903 रूपयांचा गॅस सिलेंडर आता 703 रूपयांमध्ये मिळणार आहे.