
चंद्रपूरच्या सुमठाना गावातून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ९ महिन्यांच्या बाळंतीनीने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. तरी विहिरीत उडी मारुन पाण्यात पडल्यानंतर या महिलेने पाण्यातचं एका गोंडस बाळाला जन्म दिला पण दुर्दैव की बाळ आणि बाळंतीन दोघांचाही या दुर्घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाला. तरी संपूर्ण गावाकडून या घटनेची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ९ महिन्यांच्या गर्भवतीने आत्महत्या का केली असावी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तरी यापूर्वीही या महिलेच्या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता तर त्यानंतर एका दुर्घटनेत तिच्या आठ महिन्यांच्या बाळाचा ही मृत्यू झाला होता. त्यामुळे महिलेला आपल्या होणाऱ्या बाळाबरोबरही असचं काही होईल अशी गर्भवतीस भिती होती. म्हणुन महिलेसह तिचे कुटुंबिय देखील तिच्या गरोदरपणात तिला खुप जपत होते.
तरी गर्भवती मात्र आपल्या होणाऱ्या बाळाबरोबर देखील असचं काहीसं विपरित होईल अशी कायम भिती होती. त्यामुळे ती कायम भेदरलेली होती. गावातील घरी गर्भवतीस भेटायला येणारे देखील तिच्या पुढे तिच्या दोन मृत बालकांचा विषय काढला तरी ती अस्वस्थ व्हायची. तरी आपल्या होणाऱ्या बाळासोबत काहीस वाईट होवू नये याचं भितीने या गर्भवतीने विहरीत उडी घेतल्याची माहिती पुढे येत आहे. (हे ही वाचा:- Bhosari Suicide Case: भोसरीत 15 वर्षीय मुलाची आत्महत्या, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल)
तरी या दुर्घटनेनंतर पोलिस लगेच घटनास्थळी गाखल होवून या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. गर्भवतीचे कुटुंब कुठल्यातरी कामात व्यस्त असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याची ग्वाही मृत गर्भवतीच्या कुटुंबियांनी दिली आहे. तरी गर्भवती मृत महिलेचं नाव निकीता ठोंबरे असुन तिचं वय २७ वर्ष होत.