महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहेत. राज्यातील विविध शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात कोरोनाचे नियम अधिक कडक केले जात आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यातील अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही? हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत 8 दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) जनतेला दिला आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून खोचक सवाल केला आहे.
महाराष्ट्रात आज सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्थिरता आहे. शेतकरी त्रस्त आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे. जनतेतील हा असंतोष अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येईल, या भीतीने लॉकडाऊन,निर्बंध लादले जातायत का? असा प्रश्न पडतो, अशा आशयाचे ट्विट प्रवीण दरेकर यांनी केले आहे. हे देखील वाचा- सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, तर बुलढाण्यातील 5 नगरपालिका क्षेत्रे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर
ट्वीट-
महाराष्ट्रात आज सर्व क्षेत्रात प्रचंड प्रमाणात अस्थिरता आहे. शेतकरी त्रस्त आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कोरोनाने पुन्हा डोक वर काढलं आहे.जनतेतील हा असंतोष अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येईल, या भीतीने लॉकडाऊन,निर्बंध लादले जातायत का? असा प्रश्न पडतो. @CMOMaharashtra pic.twitter.com/x8luloNet2
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 22, 2021
महाराष्ट्रात आज 5 हजार 210 कोरोना बाधीतरुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज नवीन 5 हजार 035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19 लाख 99 हजार 982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53 हजार 113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.