पावसामुळे मुंबई विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असून लवकरच नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल- उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे
Mumbai University (Photo Credits- Facebook)

गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तर रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांना नागरिक सामोरे जात आहेत. मुंबईतील ही परिस्थिती लक्षात घेता शाळा, विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

ट्विट:

मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या कॉम्प्युटर सायन्सची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.  तसंच मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे.