Suicide (Photo Credits: Pixabay, Open Clip Art)

नागपूरात (Nagpur) मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मानकापूर येथील जयहिंद नगरात राहणा-या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरी गळफास (Suicide Case) लावून आत्महत्या केली. कैवल्य योगेश काठे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. कैवल्य पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला होता. त्याच्या आत्महत्या करण्याचे कारण अजून समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कैवल्यची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्याचे वडिल शिक्षक आहेत. कैवल्य पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला होता. त्यामुळे तो त्याच्या खोलीत अभ्यास करत बसायचा. त्याचे मोबाईलवरुन ऑनलाईन क्लासेस सुरु असायचे. आत्महत्येच्या दिवशी तो त्याच्या खोलीत होता. मोबाईलमध्ये गुंतलेला असल्याने तो ऑनलाईन क्लासेस करत असेल असे त्याच्या आईला वाटले. त्यानंतर खूप वेळानंतर आतून काही आवाज आला नाही. म्हणून त्याच्या आईने रुमचा दरवाजा खोलून बघितला तर कैवल्य लटकलेल्या अवस्थेत आढळला.हेदेखील वाचा- Mumbai: टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; नराधम आरोपीला अटक

त्यानंतर त्याच्या आईने आरडाओरडा करून बाजूच्या लोकांना बोलावले व त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून काठे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

त्याच्या मृत्यूशेजारी सुसाईट नोट सापडली नसून आत्महत्या मागचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

दुसरीकडे कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत. लोक रस्त्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत पोटाची खळगी कशी भरायची या चिंतेपायी लोकांचे आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढत आहे.