भारतामध्ये यंदा 29 फेब्रुवारी दिवशी बकरी ईद (Bakrid) साजरी केली जाणार आहे. पण त्यावरून आता मुंबईच्या मीरा रोड (Mira Road) भागातील एका सोसायटी मध्ये बकर्याचा बळी देण्यावरून वाद रंगल्याचं समोर आलं आहे. तणावपूर्व स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रहिवासी सोसायटी मध्ये बकरा आणल्याला काहींनी रोखलं आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडीयात देखील वायरल झाला आहे.
Mohseen Sheikh या व्यक्तीला घरात बकरा घेऊन जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. त्याला विरोध करण्यासाठी काही रहिवासी एकत्र जमले होते. त्यांचं म्हणणं होतं की बकरा घरात नेऊ नये तसेच रहिवासी इमारती च्या आवासामध्ये त्याचा बळी देखील दिला जाऊ नये. नक्की वाचा: का साजरी केली जाते बकरी ईद? जाणून घ्या यामागच्या त्यागाची आणि बलिदानाची कथा.
रहिवाशांच्या दाव्यानुसार सोसायटीने नियम जारी केला आहे ज्यामध्ये सोसायटीत जिवंत प्राणी आणण्याला मज्जाव करण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्येही काहींनी दोन बकरे आणण्याचा प्रयत्न केला ज्याला रोखण्यात आले आहे.
पहा ट्वीट
Mumbai | "Our society had passed a rule that no livestock would be allowed inside the society, but they (some residents of the society) violated it and brought two goats inside. We are opposing it and will not allow it," says a resident of the society
"We appeal to all to… pic.twitter.com/jfxQVyaLwJ
— ANI (@ANI) June 28, 2023
Tension in Mumbai's JP infra society over Qurbani of 2 goats. A man carried two goats with him into the society for qurbani. Other communities show their anger on this. #Mumbai #Qurbani2023 #GOAT𓃵 pic.twitter.com/NNMqvQuDVs
— anuj kumar singh (@sanuj42) June 28, 2023
दरम्यान एका रहिवाशाने ANI सोबत बोलताना यामधून धार्मिक तणाव निर्माण होऊ यासाठी आवाहन केले आहे. महाराष्ट्रात मागील काही महिन्यात अनेक सणांमध्ये हिंदू-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण झाल्याचं बघायला मिळालं आहे.
महाराष्ट्रात यंदा 29 जून दिवशी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने काही गावांमध्ये सामंजस्याची भूमिका घेत मुस्लिम बांधवांनी ईद एक दिवस पुढे साजरी केली जाईल असं म्हटलं आहे.