Pune Police Attack: पुण्यातील कोथरूडमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोथरूडच्या एका पोलिस निरिक्षकावर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. या घटनेत पोलिस गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावरील हल्लामागे कुख्यात कोयता टोळीचा हात असल्याचा संशय आहे. पोलिस या प्रकरणी आरोपींचा शोध घेत आहे. (हेही वाचा- अस्वच्छता पाहून लखनऊचे महापौर संतापले, अधिकाऱ्याला म्हणाले, 'मी तुला या नाल्यात बुडवून टाकीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कुख्यात गुंड्यांच्या गॅंगला पकडण्यासाठी पथक नेमण्यात आले. पोलिस आरोपींवार शोधण्यासाठी पुणे येथील रामटेकडी येथे आले. त्याचवेळीस एका हल्लेखोराने पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कोयता फेकून मारल्याची माहिती आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. रत्नदिप गायकवाड असं हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
पोलिसांवर कोयत्याने हल्ला
पुणे- पोलीस अधिकाऱ्यावर गुंडाकडून कोयत्याने हल्ला; कोयता घेऊन वाद घालताना वाद सोडवण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला डोक्यात फेकून मारला कोयता. अधिकारी गंभीर जखमी. pic.twitter.com/K5OogMJkh0
— akshay phatak (@phatak789) August 25, 2024
जखमी पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. रत्नदिप गायकवाड हे वानवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पोलिस निहाल सिंगला पकडण्यासाठी रामटेकडी परिसरात गेले होते. हल्लेखोरांना पोलिस येण्याची माहिती मिळताच, ते सावध झाले आणि त्यांनी थेट एका पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला.
हल्लेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसरा झाले. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहिम सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बोलताना सांगितले की, निहाल सिंगने या पूर्वी देखील पोलिसांवर हल्ले केले.