पुण्यातील (Pune) जम्बो कोविड सेंटरमधून (COVID-19 Jumbo Hospital) 33 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याचे माहिती समोर आली होती. याप्रकरणी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. तसेच बेपत्ता महिलेचे नातेवाईक कोविड सेंटर बाहेर अंदोलनास बसली होती. अखेर पोलिसांना बेपत्ता महिलेचा शोध लावण्यात यश असून ही महिला पिरूगुट येथे सापडली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक चुकींच्या माहितीचा प्रसार होत आहे. यामुळे या घटनेची माहिती कानावर पडताच नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते.
प्रिया गायकवाड असे या महिलेचे नाव आहे. प्रिया यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आले होते. मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला 'तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती', अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. यामुळे जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या प्रिया यांच्या आईसह नातेवाईकांनी उपोषणचा मार्ग निवडला होता. मात्र, आज त्यांची मुलगी त्यांना पुन्हा मिळाल्याने त्यांना आनंद अश्रु अनावर झाले. हे देखील वाचा- COVID-19 Vaccine Update: आजपासून मुंबई मधील केईएम हॉस्पिटलमध्ये Oxford-AstraZeneca च्या कोविड-19 वरील लसीच्या चाचण्यांना सुरुवात
प्रिया गायकवाड ही 29 ऑगस्टपासू जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता झाली होती. संबधित महिलेचे फोटो शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले. त्यानंतर आमच्या बातमीदाराच्या मार्फत पिरूगुट येथे एक महिला नातेवाईकाकडे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, संबधित महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.