भायंदर येथे गरबा पार्टीवर पोलिसांची धाड, आयोजकांसह हॉल मालकाच्या विरोधात FIR दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Gujarati Garba/Facebook)

कोरोना संक्रमणामुळे प्रशासनाकडून सातत्याने लोकांना सावधगिरी बाळगण्यासह नियमांचे पालन करण्यास सांगितले जात आहेत. परंतु कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर नागरिकांनी पुन्हा एकदा बेजबाबदारपणे वागण्यास सुरुवात केली आहे. अशातच भायंदर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या गरबा नाइटवर धाड टाकण्यात आली. या प्रकरणी गरब्याचे आजोयक आणि हॉलच्या मालकाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गरबा नाइटमध्ये 200 जण सहभागी झाले होते. या सर्वांना दीडशे रुपयात पासची विक्री करण्यात आली होती. भायंदर पोलिसांनी यश छाजेड आणि सहमुख परिहार नावाच्या आरोपींच्या विरोधात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आयपीसी कलम 269, 270 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.(Cordelia Cruises Drugs Party: मुंबई-गोवा क्रुझ वरील ड्रग्स पार्टीचा मुंबई पोलिसांनी सुरू केला तपास; क्रुझलायनर वर पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याची पोलिसांची माहिती)

पोलिसांच्या मते आयोजनासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. मीरा-भायंद परिसरात कोरोनाची परिस्थिती पाहता अद्याप ही प्रशासनाकडून कलम 144 लागू आहे. पाच किंवा त्याहून अधिक जणांना एकत्रित येण्यास बंदी आहे. मात्र शनिवारी रात्री पोलिसांना मिळालेल्या सुचनेनुसार जेसीएस बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या संख्येने गरब्यासाठी लोक एकत्रित जमले होते. येथे जमलेल्या लोकांनी मास्क सुद्धा घातला नव्हता आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे सुद्धा उल्लंघन केले होते. पोलिसांनी आयोजकांसह हॉलच्या मालकांना याबद्दल विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

पोलिसांनी पास घेतलेल्या नागरिकांना सुचना देत सोडून दिले. मात्र आयोजक आणि हॉल मालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. तसेच अद्याप कोणाला ही अटक करण्यात आलेली नाही.