Waryam Singh (Photo Credit: Facebook)

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेची (Punjab and Maharashtra Co-operative Bank Ltd) फसवणूक केल्याप्रकरणी माजी व्यवस्थापक वरयाम सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे.पीएमसी बॅंकेतील खातेदारांनी संताप व्यक्त करत एस्प्लानेड कोर्टासमोर गर्दी करत आरबीआय आणि वरयाम सिंह (Waryam Singh) यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. पीएमसी बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी वरयाम सिंह यांच्यासह एचडीआयएलचे (HDIL)प्रमोटर राकेश वधवान आणि त्यांच्या मुलगा सारंग वधवान यांना १४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. पीएमसी बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी खातेदारांनी एस्प्लानेड कोर्टासमोर निदर्शन केली आहे. दरम्यान खातेदारांनी 'चोर है...चोर है... वरयाम सिंह चोर है!' अशा घोषणा दिल्या आहेत.

पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अहवालानुसार पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (आता निलंबित) जॉय थॉमस, अध्यक्ष वरम सिंग आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये होती. त्यामधील सारंग आणि राकेश यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा- PMC Bank Crises: ईडीकडून HDILचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांच्या खाजगी वाहनांवर जप्ती

ANI चे ट्विट-

तसेच पीएमसीच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने या बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यानुसार, बॅंकांना आता कर्ज देणे ठेवी स्वीकारणे यासह मोठ्या आर्थिक व्यवाहारांवर निर्बंध आले आहेत. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, आता खातेदार केवळ 10,000 रूपयांची रक्कम काढू शकणार आहेत.