PMC Bank Crisis: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया विरूद्ध पीएमसी बॅंक खातेदारांच्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
PMC Bank (Photo Credits: IANS)

PMC बॅंक खातेदारांच्या याचिकांवर आज ( 4 नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायलयामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. आरबीआयने (RBI) पीएमसी बॅंक खातेदारांना, ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रकरणी खातेदारांनी मुंबई हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. पीएमसी बॅंकेतील 9 लाख ठेवीदारांना मिळणार दिलासा; आरबीआयने घेतला हा मोठा निर्णय.

मुंबईमध्ये मागील दीड महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून पीएमसी बॅंकेच्या खातेदारांना पैसे काढण्यावर निर्बंध आहेत. हक्काचे पैसे अडकल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या अनेकांची गैरसोय होत आहे. यामध्ये तणावाखाली येऊन 7-8 पीएमसी बॅंक खातेदारांचा मृत्यू झाला आहे. रूनानक विद्यक सोसायटी या संस्थेनेही अॅड. क्रांती एल. सी. यांच्या कडून आरबीआयचा निषेध करत त्यांना पीएमसीवर असे निर्बंध घालण्याचे कायदेशीर अधिकार नसताना आदेश दिल्याचं सांगत आता न्यायालयात धाव घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पीएमसी बॅंक धारकांनी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन केले होते.

पीएमसी बॅंक खातेदार आणि ठेवीदारांच्या दोन याचिकांवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.