पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (26 ऑक्टोबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अहमदनगर येथील शिर्डीला भेट देतील. शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिरात (Shri Saibaba Samadhi Temple) ते पूजा आणि प्रार्थना करतील. या वेळी ते नवीन दर्शन रांग संकुलचे (Darshan Queue Complex) उद्घाटन करतील. साधारण दुपारी दोन वाजणेच्या सुमारास ते निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि धरणाच्या कालव्याचे जाळे राष्ट्राला अर्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास, पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि आरोग्य, रेल्वे, रस्ते आणि यांसारख्या क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.
शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुल ही एक अत्याधुनिक आधुनिक मेगा बिल्डिंग आहे. ज्यात भाविकांना दर्शनासाठी प्रतिक्षा करताना आरामदायी जागा उपलब्ध करून दिली आहे. निळवंडे धरणाच्या डाव्या किनारी कालव्याचे जाळे पंतप्रधान राष्ट्राला अर्पण करतील. ज्याचा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील 182 गावांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक आणि स्वरुप
- शिर्डी येथे दुपारी 1 वाजता आगमन
- साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा
- दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन
- निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण
- दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी
- सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश
- प्रकल्पांचे भूमीपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मदी सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना
दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा शुभारंभ करतील. या योजनेचा महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ होईल. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दौऱ्यापुर्वीच काल दिल्लीला जाऊन आले आहेत. त्यामुळे आजच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेगळी घोषणा करतात का, याबाबतही उत्सुकता आहे. खास करुन राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणवीर आला असताना आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधा काही घोषणा करत विरोधक आणि समर्थकांनाही धक्का देणार का याबाबत उत्सुकता आहे.