संजय धोत्रे (Photo Credits-Twitter)

PM Modi Swearing-in Ceremony 2019: सतराव्या लोकसभेसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (30 मे) दिल्लीत राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी त्याना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर आता भाजप प्रणित एनडीए मंत्रिमंडळातील निवडक खासदार देशभरातून पद आणि गोपनियतेची शपथ घेत आहेत.

तर अकोला (Akola) लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांनी केंद्रीय मंत्री म्हणून मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री म्हणून धोत्रे यांना पहिल्यांदाच संधी मिळत आहे. ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडूण आले आहेत. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी वंचित बहुजन आघाडी सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.(PM Modi Swearing-in Ceremony 2019: महाराष्ट्रातील खासदार केंद्रात मंत्री, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांच्यासह पाहा कोणाकोणाला मिळाली संधी)

धोत्रे यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचा योग्य प्रकारे वापर करत त्यांनी शेतकऱ्यांना योग्य सल्ला प्राप्त व्हावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्राची सुरुवात केली. तसेच धोत्रे यांच्या संघटन कौशल्यामुळे जिल्ह्यात भाजपाचा विस्तार झाला. एकापाठोपाठ जिल्ह्यात भाजपाचे आमदार, महापालिकासारख्या निवडणुकीत धोत्रे यांना मोठे यश मिळाले. व्यवसायातील प्रचंड मेहनतीमुळे त्यांना 1987 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उद्योजकता पुरस्कार मिळाला.