PM Modi in Maharashtra: पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; कल्याण अन् दिंडोरीत जंगी सभेच आयोजन; मुंबईत करणार रोड शो
PM narendra Modi PC ANI

PM Modi in Maharashtra: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आत्तापर्यंत ४ टप्प्यात राज्यासह देशभरात मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात दोन ठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत. दिंडोरी आणि कल्याण येथे त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या (Lok Sabha Election) १३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील ६ मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, नाशिक, दिंडोरी धुळे आणि पालघर या मतदारसंघातही मतदान होणार आहे. २ दिवस आधी म्हणजे १८ मे रोजी या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत चारही टप्प्यातील प्रचाराला मोदींनी हजेरी लावून अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या.

भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या सभांच्या आराखड्यानुसार, पंतप्रधान मोदी आज दुपारी दिंडोरी येथील एका सभेला संबोधित करतील. त्यानंतर संध्याकाळी मोदी कल्याण येथे सभा घेतील. कल्याणच्या सभेनंतर उत्तर पूर्व मुंबईत मोदी रोड शो देखील करणार आहेत. विक्रोळी येथून पंतप्रधानांच्या रोड शोची सुरुवात होईल. त्यामुळे वाहतूकीत देखील मोठा बदल केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील जनतेला संबोधित करतील. मोदी उत्तर पूर्व मुंबई येथे एक रोड शो करणार आहेत. मोदींच्या सभेसाठी भाजप नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे.