Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास सवड आहे, पण दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी वेळ नाही- शरद पवार
Sharad Pawar, Narendra Modi (Photo Credit: PTI)

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) प्रचाराला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “भाजपाच्या हातात सत्ता गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढू लागले आहे. देशात शेतकरी आंदोलन करत आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परदेशात जायला वेळ आहे. पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास सवड आहे. मात्र, दिल्लीत सुरु असलेल्या मो शेतकऱ्यांसाठी वेळ नाही", असे शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार आज झारखंड दौऱ्यावर आहेत. दरम्यान, रांची येथील हरमू मैदानात आज आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेत शरद पवार म्हणाले, “देशभरात प्रेम, बंधुभाव, वाढवणे, ही केंद्राची जबाबदारी असते. परंतु, भाजपा देशात जातीयद्वेषाचे विष पसरवत आहे. शेतकरी 100 दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. आपल्या हक्कांसाठी तो लढत आहे. पण केंद्रातील सरकार त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही. पंतप्रधानांना कोलकात्याला जाण्यासाठी वेळ आहे. तिथल्या पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला वेळ आहे. पण इथे दिल्लीतल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Bhima Koregaon Case: तब्बल दोन वर्षांनी 81 वर्षीय कवी Varavara Rao यांची जामीनावर सुटका; नानावटी रुग्णालयातून रात्री उशीरा बाहेर

विधानसभा निवडणुकीची घोषणा पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच पश्चिम बंगालमधील जनतेचा ममता दीदींनी विश्वास घात केला आहे. बंगालमधील जनतेला आता परिवर्तन हवे आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.