मिरज : अन्न व स्वच्छतेच्या बाबतीत होणारी हेळसांड मांडणाऱ्या अनेक घटना मागील काही दिवसांपासून समोर येत आहते. त्यात आणखीन एक भर म्हणजे सांगलीतील बाजारात चक्क प्लॅस्टिकची अंडी विकली जात असल्याचा आरोप एका नागरिकाने केला आहे. एबीपी माझाच्या सूत्रांच्या माहितीनुसार मिरज तालुक्यातील बुधगाव परिसरात ज्ञानेश्वर नामक एका व्यक्तीने हा दावा केला आहे. स्थनिक किराणा दुकानातून आणलेली अंडी ही नेहमीसारखी नसून त्यात बनावट केली गेली आहे असे ज्ञानेश्वर यांचे म्हणणे आहे. या प्रकरांमुळे अन्न व्यवसायाशी संबंधित लोकांकडून सामन्यांच्या आरोग्याशी खेळ केली जात असल्याची चर्चा खव्य्यांमध्ये ऐकू येत आहे.
ज्ञानेश्वर यांनी बाजारातून अंडी आणून ती उकडण्यासाठी ठेवली असताना अचानक पाण्यात खूप फेस येऊ लागला. तसेच अंडी फुटून त्यातील पांढरा व पिवळा बल्क एकत्र झाल्याचे दिसून आले. काही वेळाने ही अंडी रबरासारखी ताणली गेली आणि त्यातून प्लास्टिक जळल्याचा वास येऊ लागला.यांनतर त्यांनी दुसऱ्या दुकानातून नवीन अंडी आणून उकडायला ठेवली मात्र ती चांगली निघाली यामुळे पहिल्या दुकानातलीच अंडी बनावटी असल्याचे लक्षात आले असे ज्ञानेश्वर यांनी म्हंटले आहे. आता लवकरच बाजारात येणार शाकाहारी अंडे; जाणून घ्या काय असेल वेगळेपण
अशी ओळखा नकली अंडी
प्रथमदर्शनी पाहिल्यास ही अंडी नेहमीसारखीच दिसतात मात्र नीट निरखून पाहिल्यावर या अंड्यांमध्ये फरक लक्षात येतो.
- नकली किंवा बनावटी अंड्यांचे कवच अधिक चमकदार व टणक असते.
- अंडे हलवून पाहिल्यास येणारा आवाज हा नेहमीपेक्षा जास्त असतो.
- अंड्यांच्या आतल्या बाजूस खडबडीत रेषा दिसून येतात.
- ही अंडी पाण्यात टाकून पहिल्यास नकली अंडी बुडत नाहीत उलट पाण्यावरच तरंगत राहतात.
- अंड्याचे कवच फोडल्यावर लगेचच पांढरा आणि पिवळा बल्क एकमेकात मिसळलेले दिसून येतात.
- दुकानातील नैसर्गिक अंड्यांचा वास घेऊन पाहिल्यास कच्च्या मांसासारखा येतो तर प्लॅस्टिकच्या अंड्याला वासच येत नाही.
- नकली अंड्यांभोवती माश्या किंवा कीटक फिरकत नाहीत.
दरम्यान सांगली मध्ये घडलेल्या प्रकारची तक्रार नोंदवून अन्न व औषध प्रशासनातर्फेने तपासणी चालू आहे. यांनंतरच प्लॅस्टिकच्या अंड्यांच्या विक्री बाबतची तथ्यता समोर येईल.