Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

वस्तू व सेवा कर (GST) अधिकारी असल्याचे दाखवून लोकांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) दोघांना अटक केली आहे. दिल्लीतील मुखर्जी नगर (Mukherjee Nagar) येथील मनोजकुमार छबीनाथ आणि ओमप्रकाश पांडे अशी आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी व्यापारी शादान खान यांनी शुक्रवारी चिखली पोलिस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल दाखल केला होता.पोलिसांनी सांगितले की, दोघांनी दिल्लीतील जीएसटी अधिकारी असल्याचा खोटा दावा केला. त्यांनी बनावट स्वाक्षरी असलेली बनावट ओळखपत्रेही मिळवली. तपासकर्त्यांनी सांगितले की, दोघांनी खानकडे जाऊन त्याच्याविरुद्ध जीएसटी उल्लंघनाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. हेही वाचा Murder: वडिलांच्या उपस्थितीत 24 वर्षीय‌ मुलाची हत्या, गुन्ह्यात तरुणाच्या सासरच्या लोकांचा हात असल्याचा पोलिसांचा संशय

घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम 420, 464, 465, 468, 471, 171, 34 नुसार अटक केली. त्यांनी बनावट ओळखपत्रे आणि इतर कागदपत्रे कशी मिळवली आणि जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून आणखी लोकांची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास सुरू आहे.