फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने (Mumbai Police Cyber Cell) सीबीआयचे संचालक आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांना समन्स बजावले आहे. सुबोध जयस्वाल यांना 14 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुख असताना महाराष्ट्रातील पोलिस बदल्यांमध्ये कथित भ्रष्टाचाराबद्दल तयार केलेल्या अहवालाच्या 'लीक' शी संबंधित आहे. त्यावेळी जयस्वाल हे पोलीस महासंचालक होते.
मुंबई पोलिसांच्या निवेदनात असे म्हटले आहे की, "सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पोलिसांच्या ट्रान्सफर-पोस्टिंगवरील महाराष्ट्र गुप्तचर विभागाचा डेटा लीक केल्याप्रकरणी बोलावले आहे. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी त्यांना येत्या 14 ऑक्टोबरला सेल समोर हजर राहावे लागणार आहे. हे देखील वाचा-Cruise Ship Drug Case: NCB ची कारवाई आणि नवाब मलिक यांचे आरोप यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया; पहा Video
एएनआयचे ट्वीट-
CBI Director Subodh Kumar Jaiswal has been summoned by Cyber Cell of Mumbai Police in connection with leak of Maharashtra Intelligence Department data on police transfer-posting. The summon has been sent via an e-mail, asking him to appear before it on October 14: Mumbai Police pic.twitter.com/0DBvfvQdd0
— ANI (@ANI) October 9, 2021
चौकशी दरम्यान वरिष्ठ राजकीय नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून त्याचा अहवाल जाणूनबुजून लीक करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. परंतु, सायबर सेलने या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये शुक्ला किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही.