Petrol Diesel Rates: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे भाव सर्वाधिक; मुंबई, पुणे सहित मुख्य शहरातील आजचे दर जाणून घ्या
Petrol - Diesel Price | Image Use For Representational Purpose | File Photo

Petrol Diesel Rates In Maharashtra: केंद्र सरकारने (Central Government) मंगळवारी, 5 मे रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel)  उत्पादन शुल्कात (Excise Duty)  अनुक्रमे 10 व 13 रुपयांची वाढ केली आहे. मात्र , ही वाढ ग्राहकांसाठी नसून त्यांना जुन्या दरात पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार आज दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे नियमित दरच पाहायला मिळत आहेत. असं असलं तरी एक साधारण तुलना केल्यास दिल्ली, चेन्नई, कोलकाता या मुख्य शहरांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, सहित सर्व शहरात सर्वाधिक भाव असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपुर सहित मुख्य शहराच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती इथे जाणून घेऊयात..

देशातील मुख्य शहरातील पेट्रोल डिझेलच्या किमतीनुसार, जिथे दिल्ली मध्ये पेट्रोलचे दर 71.26 रुपये प्रति लिटर,कोलकाता मध्ये प्रतिलिटर 73.30 रुपये, चेन्नई मध्ये प्रति लिटर 75.54 रुपये इतके आहे तिथे मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचे दर हे सर्वाधिक म्हणजे 76.31 रुपये इतके असल्याचे समजत आहे. तर डिझेलच्या बाबाबत मुंबईमधील दर हे दिल्ली पेक्षा कमी आहेत.

महाराष्ट्रातील मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेल च्या किंंमती

शहर आजची पेट्रोल किंमत आजची डिझेल किंमत
मुंबई 76.31  66.21
पुणे  76.41  65.28
नाशिक  76.74 65.62
नागपुर 76.44 65.37
कोल्हापुर 76.55  65.47
रत्नागिरी  77.45 66.31
धुळे 76.77 65.66
परभणी  78.79  67.60
जळगाव 77.13 66.03

महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल च्या किंंमती जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची मागणी बरीच कमी झाली आहे. तसेच अर्थचक्र ठप्प असल्याने सर्व राज्यांच्या तिजोरीवर ही तणाव येत आहे, म्हणूनच उतपादन शुल्क वाढूनही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री भावात वाढ केली नसल्याचे दिसत आहे.