मुंबई सह देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सलग 7व्या दिवशी वाढ; जाणून  घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील इंधन दर
Petrol Price (File Photo)

Petrol Diesel Price 23rd September: काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियामधील अरामको या मोठ्या तेल कंपनीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर त्याचा परिणाम तेल पुरवठ्यावर झाला आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून भारतामध्ये इंधनदर झपाट्याने वाढत आहेत. देशातील विविध राज्यांसह आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज (23 सप्टेंबर) मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 80 रूपायांच्या आसपास पोहचले आहेत. ही सलग सातव्या दिवशी वाढ असल्याने सामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज मुंबईतील पेट्रोल दर प्रति लीटर 79.57 तर डिझेलचा दर प्रति लीटर 70.22 रूपये इतका आहे.

अरामकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या दरामध्ये होणारी वाढ, आखाती देशामधील तणाव, अमेरिका - चीन मधील संबंध या चा परिणामदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर होत असल्ताचं दिसून आले आहे. भारत देश 83% आयातीमधून येणार्‍या इंधनावर अवलंबून आहे. सौदी अरेबिया मधून भारताला दुसर्‍या क्रमांकाचा इंधनपुरवठा होतो. सौदी अरेबिया मध्ये Aramco तेल कंपनीच्या 2 फॅसिलिटी सेंटरवर ड्रोन हल्ला

 

महाराष्ट्रातील महत्वाच्या शह्रांमधील पेट्रोल आणि डिझेल दर काय?

मुंबई

पेट्रोल दर - 79.57 रूपये आणि डिझेल दर 70.22 रूपये

ठाणे / नवी मुंबई

पेट्रोल दर - 79.40 रूपये आणि डिझेल दर 68.93 रूपये

नागपूर

पेट्रोल दर - 79.69 रूपये आणि डिझेल दर 69.27 रूपये

परभणी

पेट्रोल दर - 81.31 रूपये आणि डिझेल दर 70.80 रूपये

नांदेड

पेट्रोल दर - 81.47 रूपये आणि डिझेल दर 70.98 रूपये

महाराष्ट्रामध्ये परभणी, नांदेड मध्ये मुंबई, ठाण्याच्या तुलनेत लोकल टॅक्स अधिक असल्याने तेथील पेट्रोल आणि डिझेलच्या दराने 80 च्या पार इंधर दर गाठला आहे.