मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा एकदा महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण तापताना दिसत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली होती. याचपार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात संभाजीराजे यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
मराठा आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. तसेच माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे, अशा आशयाचे ट्वीट संभाजीराजे यांनी केले आहे. हे देखील वाचा- शिवसेनेचे नेते Sanjay Raut यांच्यावर महिलेचे गंभीर आरोप; हाय कोर्टाने दिले चौकशीचे आदेश, जाणून घ्या सविस्तर
संभाजीराजे यांचे ट्वीट-
#मराठा_आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
मराठा आरक्षणाबाबत येत्या आठ दिवसांत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येईल. तसेच मराठा समाजातील निवडक लोकांची एक समिती नेमून त्याच्या माध्यमातून अन्य मागण्या तातडीने सोडविण्यात येईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी खासदार संभाजीराजे आणि सकल मराठा समाजाला दिली होती.