विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. दरम्यान सर्वच राजकीय पक्ष जनेतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मतदारांच्या समस्याचे पूर्णपणे निवारण केले जाईल, असे अश्वासनही देण्यात आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे युवानेते अदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुरंदर येथे अदित्य ठाकरे यांनी विजय शिवतारे यांच्या प्रचारात सामिल होऊन जनेतेशी संवाद साधला आहे. एवढेच नव्हे तर, मागील निवडणुकीत जनतेने शिवसेना पक्षाचे 63 आमदार निवडून आणले होते. परंतु, यावेळी पक्षाच्या दुप्पट जागा निवडून येतील, असा जनेतकडून अशिर्वाद मागितला आहे.
पुरंदर येथे पार पडलेल्या प्रचार सभेत अदित्य ठाकरे हे शेतकरी आत्महत्या वर शोक व्यक्त करत म्हणाले की, शिवतारे यांच्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला अधिक गरज आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावा लागत आहे. एवढेच नव्हे तर, दुष्काळामुळे लोकांच्या आत्महत्या होत आहे. मगील विधानसभा निवडणुकीत जनतेने शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले होते. परंतु, यावेळी त्यापेक्षा दुप्पट जागा निवडून येतील असा अशिर्वाद द्या. त्याचबरोबर आशिर्वाद द्यायचा असेल तर शिवसेनेला मतदान करा, असेही अदित्य ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा-उद्धव ठाकरेंंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर दाखल झाला आचारसंहिता भंगाचा गुन्हा
या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षाने त्यांच्या युवा नेत्यांना वर्चस्व निर्माण करण्याची संधी दिली आहे. विधानसभा निवडूक येत्या २१ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत कोणता पक्ष आपले वर्चस्व निर्माण करेल याकडे अनेकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.