Devendra Fadnavis On Real Shiv Sena: आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला राज्यात मोठा विजय (Mahayuti's victory) मिळाला आहे. अशातचं आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे गट शिवसेना (Shinde Group Shiv Sena) आणि अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. 'जनतेने आपला जनादेश दिला असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाचं खरी शिवसेना म्हणून लोकांनी स्वीकारले आहे,' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने आपला जनादेश दिला असून लोकांनी एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना म्हणून स्वीकारले आहे. तसेच अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीची वैधता मिळाली आहे.' त्यानंतर पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांना मिठाई भरवून विजय साजरा केला. (हेही वाचा -Sarita Fadnavis Reaction to Devendra Fadnavis Victory: 'माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार'; महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची प्रतिक्रिया)
दरम्यान, आज मुंबईतील भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयासाठी आनंद साजरा केला. यावेळी ते जिलेबी बनवताना दिसले. तथापी, महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्वत:चे एक आधुनिक अभिमन्यू म्हणून वर्णन केले. ज्याला 'चक्रव्यूह' कसा तोडायचा हे माहित आहे, या विजयात माझे योगदान थोडेच आहे, हा आमच्या संघाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. (हेही वाचा -Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे फॅक्टर अपयशी; मराठवाड्यात महायुतीला भक्कम पाठिंबा)
"People accepted Eknath Shinde as real Shiv Sena": Dy CM Devendra Fadnavis as Mahayuti sweeps Maharashtra polls
Read @ANI Story | https://t.co/CKOt8hftgr#EknathShinde #MaharashtraPolls pic.twitter.com/kgSA9yHhj4
— ANI Digital (@ani_digital) November 23, 2024
प्रचारादरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी, अमित शहा भाई आणि नड्डाजी सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिले. मला अभिमान आहे की 200 जागा जिंकण्याचा माझा अंदाज खरा ठरला आहे. आम्ही एक संघ म्हणून लढलो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी 231 जागा महायुतीने जिंकल्या आहेत. तथापी, महाविकास आघाडीला 50 जागांवर विजय मिळाला आहे.