महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या (Coronavirus) दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे नियम अधिकाधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान कोविड सेंटर्समध्ये (COVID Centres) योग्य ती काळजी घेतली जात आहे. असे असताना देखील बुलढाण्याच्या (Buldhana) शेगाव (Shegaon) येथील कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या सेंटरमध्ये शुक्रवारी (12 मार्च) दुपारचे जेवण दुपारी 2 पर्यंत न आल्याने या सेंटरमधील रुग्णांनी सेंटरबाहेर येऊन आंदोलन केले. हा प्रकार उघडकीस येताच संतप्त कोविड रुग्णांनी सेंटरबाहेर येऊन आंदोलन केले.
या घटनेबाबत बुलढाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी 'कॉन्ट्रॅक्टरच्या सिलेंडरमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने जेवण देण्यास विलंब झाला', असे सांगितले. मात्र तरीही आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत असेही ते म्हणाले.हेदेखील वाचा- Coronavirus in Mumbai: कोरोनाचा धोका पुन्हा वाढला! मुंबईत आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; पाहा संपूर्ण आकडेवारी
Maharashtra: Patients being treated at #COVID19 care centre in Shegaon came outside to protest after not receiving food till 2 pm
"I am told that contractor's cylinder wasn't working hence the delay but we're running a thorough enquiry," said Buldhana Addl Dist Collector (12.03) pic.twitter.com/cFMyJn80EV
— ANI (@ANI) March 13, 2021
तेथील रुग्णांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कोविड सेंटरमध्ये दुपारचे जेवण 12.30 वाजेपर्यंत येते. मात्र 2 वाजून गेले तरी जेवण न आल्याने येथील रुग्णांनी संताप व्यक्त केला. शेगावमधील कोविड सेंटरमध्ये घडलेला हा प्रकार खूपच धक्कादायक असून अशा पद्धतीने कोविड रुग्ण सेंटरबाहेर येणे हे त्यांच्या आणि अन्य लोकांच्या जीवाशी खेळ असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
दरम्यान महाराष्ट्रात काल कोरोनाचे आणखी 15,817 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 56 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील COVID19 चा आकडा 22,82,191 वर पोहचला आहे.