रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) काल झालेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटामध्ये (Parshuram Ghat) पुन्हा दरड कोसळल्याची (Land slide) घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai Goa Highway) जाणारी वाहतूक रेंगाळली आहे. परशुराम घाट हा कोकणातील सध्या धोकादायक वळणाचा रस्ता आहे. मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामासोबत आता परशूराम घाटाच्या देखील सपाटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र अशातच अवकाळी बरसणार्या पावसातही परशूराम घाटात दरड कोसळली असल्याने सध्या कोकणात आणि गोव्याकडे जाणार्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परशूराम घाट वगळून पर्यायी मार्ग कोणते?
- परशूराम घाट वगळून कोकणात जायचे झाल्यास सध्या लोटे-चिरणी-कळंबेस्ते-चिपळूण मार्गाने वाहतुक वळवण्यात आली आहे.
- काहीसा अरूंद पण गुणदे आणि शेल्डी हा देखील पर्याय आहे.
- परशुराम घाट आणि कशेडी येथील खवटी घाट टाळून पुढे जायचे असल्यास मुंबईकडून येताना महाड - लाटवण मार्गे दापोली आणि दापोली येथून दाभोळ - धपावे या फेरीबोटीने पलीकडे धोपावे येथून श्रृंगारतळी मार्गे थेट गुहागर आणि चिपळूण, रत्नागिरी येथे जाता येते.