Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परम बीर सिंह (Param Bir Singh) खंडणी आरोप प्रकरणात अल्पेश पटेल (Alpesh Patel) नामक व्यक्ती अटक करण्यात आली आहे. अल्पशे पटेल हा हवाला ऑपरेटर (Hawala Operator) असल्याचे सांगितले जाते. त्याला गुजरातमधील मेहसाणा रेल्वे स्थानकावरून (Mehsana Railway Station) काल रात्री अटक करण्यात आली. अल्पेश पटेल याने परम बीर सिंह यांच्या सांगण्यावरुन तक्रारदार बिमल अग्रवाल यांच्याकडून पैसे गोळा केल्याचा आरोप आहे. या अकटेमुळे परमबीर सिंह पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. वरवर चर्चेत असलेले हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच खोलवर आणि वस्तृतपणे पुढे येऊ लागले आहे.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप करुन मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परम बिर सिंग खळबळ उडवून दिली. त्यामुळे राज्याचे राजकीय वर्तुळ आणि पोलीस खाते पुन्हा एकदम चर्चेच्या केंद्रस्थानी आले. या प्रकरणाची आता चौकशी सुरु आहे. दरम्यान, परमबीर सिंह आणि अनिल देशमुख असे दोघेही सध्या गायब आहेत. (हेही वाचा, Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर हजर राहू शकले नाहीत)

दरम्यान, राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्याबाबत उच्च न्यायालयात बुधवारी (20 ऑक्टोबर) भूमिका मांडली. या वेळी राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ठावठिकाणा माहिती नाही. ते सध्या बेपत्ता आरहेत. त्यांना अनेक वेळा नोटीसही बजावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून सरक्षण देण्याचे न्यायालयाला दिलेले अश्वासन आपण कायम करु शकत नाही. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे परमबीर सिंह यांची अटक अटळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ट्विट

परमबीर सिंह यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन ॲट्राॅसिटी कायद्याच्या व भारतीय दंड संहितेच्या काही कलमांतर्गत परमबीर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी करत परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.