मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहराची लाईफलाईन असल्याने अनेकांच्या दिवसांचं वेळापत्रक यावर अवलंबून असतं. एक ट्रेन चुकणं म्हणजे अनेकांसाठी पुढे सार्याच गोष्टींचं गणित चुकण्यासारख्या आहे. काल (7 नोव्हेंबर) पनवेल-सीएसटीएम स्थानकादरम्यान खांदेश्वर स्थानकाचा (Khandeshwar Station) थांबा चुकवून ट्रेन पुढे गेली. याप्रकरणी मध्य रेल्वेने चौकशीचे (Central Railway) आदेश दिले आहेत.
पनवेल स्थानकातून दुपारी 1.19 वाजता निघालेली ट्रेन सीएसएमटी कडे रवाना झाली. दुपारची वेळ असल्याने ट्रेनला फार गर्दी देखील नव्हती. 1.24 वाजता ही ट्रेन खांदेश्वर स्टेशन मध्ये पोहचणं अपेक्षित होतं. लोकल स्थानकात वेळेत आली पण न थांबताच पुढे गेली. खांदेश्वर स्थानकात न थांबता पुढे मानससरोवर कडे गेलेली ट्रेन पाहून प्रवाशांमध्येही गोंधळाचं वातावरण होतं. Ahmedabad-Mumbai Tejas Express मुंबई मध्ये अंधेरी स्टेशन वर थांबा न घेताच धावली; Western Railway चे चौकशीचे आदेश .
ट्रेन मध्ये स्टेशन येण्यापूर्वी केली जाणारी ‘पुढील स्थानक खांदेश्वर..’ही घोषणा देखील झाली पण गाडी न थांबल्याने काहींनी आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण या प्रकारामुळे अनेकांना पुढे मानससरोवरला उतरून पनवेल लोकल पुन्हा एक स्टेशन मागे यावं लागलं.
हार्बर मार्गावर खांदेश्वर स्टेशनवर ट्रेन न थांबल्याच्या प्रकारामध्ये सुदैवाने कोणी प्रवासी जखमी नाही. थांबा चुकवणे हा गंभीर प्रकार आहे. घडलेल्या प्रकारामध्ये लोकलचे मोटरमन आणि गार्ड यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी नंतर थांबा चुकवल्याचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी 'मटा' शी बोलताना सांगितले आहे.