अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस (Ahmedabad-Mumbai Tejas Express) काल (21 फेब्रुवारी) मुंबई मध्ये नियोजित अंधेरी स्टेशनवर थांबा न घेताच पुढे धावल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान यावरूनच आता पश्चिम रेल्वेने पश्चिम रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेसने अंधेरीला थांबा न घेतल्याने पुढे दादर स्थानकामध्ये तात्काळ थांबा देण्यात आला. दादर स्टेशनवर त्यावेळेस अंदाजे 42 प्रवासी उतरले.
पश्चिम रेल्वे कडून देखील त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस अंधेरी स्थानकात न थांबता पुढे गेली.
ANI Tweet
Ahmedabad-Mumbai Tejas Express moved past Andheri yesterday without stopping for scheduled halt. It was brought to notice of higher officials & an unscheduled halt was arranged at Dadar where around 42 passengers deboarded. Matter is being enquired: Western Railway
— ANI (@ANI) February 22, 2021
देशातील पहिली कॉरपरेट ट्रेन अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस ला रेल्वेने 14 फेब्रुवारी पासून ट्रेन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 पासून कोरोना संक्रमण पाहता लॉकडाऊन मुळे तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने ती बंद करण्यात आली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारी पासून अहमदाबाद-मुंबई आणि दिल्ली- लखनई या दोन्ही मार्गावर पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.