पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले यांच्यासह या पाच उमेदवारांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण
Pankaja Munde, Udayanraje, Harshvardhan, Rohini (Photo Credits; PTI/IANS/Instagram)

यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काही मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे तर काही मतदारसंघात अनपेक्षित असे होते. राज्यात 288 जागांसाठी झालेल्या या विधानसभा निवडणूकीमध्ये पुन्हा महायुतीचेच सरकार आले असले तरीही महाआघाडीने हा आनंद फार काळ टिकू दिला नाही. कारण भाजपला ज्या अपेक्षित जागांवर विजय अपेक्षित होता त्या जागांवर जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीने झेंडा रोवला. यात परळीतून भाजपचे पंकजा मुंडे, साता-यातून उदयनराजे भोसले, इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील, कर्जत-जामखेडे मतदारसंघातून राम शिंदे आणि मुक्ताई नगरमधून रोहिणी खडसे यांचा पराभव भाजपच्या पचनी पडला नाही.

मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेला पराभूत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निकाल दरम्यान रोहिणी खडसे या 500-1000 मतांच्या फरकाने मागे पुढे जात होत्या. मात्र, निकालाच्या अखेर चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडेस यांच्यापेक्षा 1987 मत अधिक मिळवून मुक्ताईनगर मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे परळीच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विजयी झाले.

हेही वाचा- NCP च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली खोचक टीका; लेकीला सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे मानले आभार

तर इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी भाजप पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटीलांचा पराभव केला. मुक्ताईनगरमधून भाजपच्या रोहिणी खडसेंवर मात करत अपक्षचे चंद्रकांत पाटीलांनी विजय मिळवला. तसेच कर्जत-जामखेड मतदारसंघातून NCP चे रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे च्या भरघोस मतांनी पराभव केला. या पराभव भाजपला आणि मुख्य करुन या दिग्गज नेत्यांच्या पचनी पडणारा नव्हता. त्यामुळे पराभवाची झळ इतकी आहे की त्याचे सावट त्यांच्या दिवाळीवर दिसेल असं म्हणायला हरकत नाही.