महाराष्ट्रात (Maharashtra) महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्काराच्या (Rape) घटना वाढू लागल्या आहेत. राज्यातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, मुंबईतील साकीनाका घटनेने संपूर्ण राज्याला हादरून सोडले असताना डोंबिवली येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर राजभरातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही बलात्कार प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पंकजा मुंडे यांनी नुकतीच एबीपी माझाला मुलाखात दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यात घडणाऱ्या बलात्काराच्या घटनेवरही आपले मत मांडले आहे. महाराष्ट्र्रात, भारतात आणि आपल्या संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान आहे. मी माझ्या पहिल्या भाषणात महिला अत्याचारवर भाष्य केले आहे. महिला अत्याचार घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात यावे. महत्वाचे म्हणजे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा करावी, अशी मागणी आम्ही लावून धरली होती. अशा प्रकारच्या घटनांवर संताप व्यक्त केला जातो. परंतु, हे काम पोलिसांचे आहे.फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत. ज्यामुळे आरोपींना लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. या घटनेतील आरोपींना अशी शिक्षा झाली पाहिजे की, यानंतर राज्यात कोणीही महिलेला स्पर्श करण्याचा आणि त्रास देण्याचा विचार करणार नाही. त्यांची महिलेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. हे देखील वाचा- Bhayandar Rape Case: भाईंदर मध्ये 22 वर्षीय तरूणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक
दरम्यान, साकीनाका बलात्काराच्या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवली परिसरात एका 15 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 29 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलीवर जानेवारीपासून तर सप्टेबरपर्यंत अत्याचार सुरु होते. सुरुवातीला एका आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवला होता. याच व्हिडिओचा गैरफायदा इतर आरोपींनी पीडितावर वारंवार अत्याचार केला.