Pankaja Munde | (Photo Credit - Twitter)

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांचा बैठकांचा सिलसिला सुरु होता. त्यानंतर आता भाजपने आज पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. विधान परिषदेवर घेत पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. कारण लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. कारण ओबीसी आणि मराठा समाज तेढ निर्माण झाला होता, असं बोललं जात होतं. यामुळेच त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी केली जात होती. (हेही वाचा - Sant Tukaram Maharaj Palkhi 2024: खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी मध्ये घेतले संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आशीर्वाद (Watch Video))

सदाभाऊ खोत यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये योगेश टिळेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. योगेश टिळेकर हे देखील एक ओबीसी चेहरा आहे. भाजप पुण्यातील ते एक मोठं नाव आहे. त्यामुळे त्यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होतानाच दिसत आहे. याचं कारण म्हणजे या निवडणुकीत भाजपचे 5, शिंदे गटाचे 2, अजित पवार गटाचे 2 आणि महाविकास आघाडीकडूनही 2 उमेदवार दिले जातील, असं सांगण्यात येत आहे.

विधान परिषदेवर घेत पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. कारण लोकसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. यासोबतच लोकसभेत भाजपला शेतकऱ्यांचाही मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं.