Pankaja Munde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यभर केलेले दौरे पाहून भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde भलत्याच प्रभावीत झाल्या. त्यातून त्यांनी शरद पवार यांच्या कामाबाबत कौतुकोद्गार काढत ट्विट केले. या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात जोरदार चर्जाही रंगली. पंकजा यांच्या या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar यांच्याकडून प्रतिसादही मिळाला. परंतू, आता हे ट्विटच पंकजा मुंडे यांच्याकडून डिलीट करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा सुरु झाली आहे. उल्लेखनीय असे की, एकनाथ खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशापूर्वी जयंत पाटील यांचे ट्विट रिट्विट केले होते. काही वेळात पुन्हा ते ट्विट डिलिट करण्यात आले.

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, ''hats off ... कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले ... पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे''.

Pankaja Munde tweet

दरम्यान, रोहीत पवार यांनी पंकजा मुंडे यांना प्रतिसाद देत केलेल्या रिट्विटमध्ये म्हटले आहे की, 'धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा'. (हेही वाचा, Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिवसेना, NCP, काँग्रेस पक्षामधील प्रमुख चेहरे चर्चेत; एकनाथ खडसे स्पर्धेत? पाहा नावे)

रोहित पवार ट्विट

दरम्यान, गेल्या प्रदीर्घ काळापासून भारतीय जनता पक्षांमध्ये जनमत असलेल्या नेत्यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कोंडी करण्यात आली. त्याचे पर्यावसन एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात झाला. आता ऊसतोड मजूरांच्या नेतृत्वावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. गेली प्रदीर्घ काळ पंकजा मुंडे या ऊसतोड मजूरांचे नेतृत्व करतात. या नेतृत्वारा धनंजय मुंडे यांच्याकडून आव्हान मिळत आहे. दरम्यान, भाजपने आता या मजुरांचे नेतृत्व आमदार सुरेश धस यांच्याकडे दिल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे समजते. कदाचित त्यातूनच त्यांनी हे ट्विट करुन इशारा दिल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.