Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिवसेना, NCP, काँग्रेस पक्षामधील प्रमुख चेहरे चर्चेत; एकनाथ खडसे स्पर्धेत? पाहा नावे
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेतील रिक्त असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 जागा (Governor Appointed Seats in MLC) लवकरच भरल्या जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 जागा (Maharashtra MLC Election 2020) भरण्याबाबत उद्या (बुधवार, 27 ऑक्टोबर) प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो. त्यादृष्टीने महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. महाविकासआघाडीतील शिवसेना ( Shiv Sena) , राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) असे तिन्ही घटक पक्ष समसमान जागा (प्रत्येकी 4) वाटून घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, या तिन्ही पक्षांमध्ये विविध चेहऱ्यांमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळविण्यासाठी मोठी चुरस आहे. या संभाव्य नावांमध्ये खालील काही चेहऱ्यांची चर्चा आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील अनेक चेहऱ्यांनी राज्यपाल नियुक्त जागांसाठी आपापल्या नेतृत्वाकडे दावा सांगितला आहे. परंतू, गेल्या काही काळात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आणि राज्य सरकारचे संबंध पाहता राज्यपाल बरेचसे निकष आणि आपली सदसदविवेकबुद्धी वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निकषात बसणारी नावे आणि आपल्या कार्यकर्त्यांचे समाधान अशी दुहेरी कसरत महाविकासआघाडी सरकारमधील घटक पक्षांना घ्यावी लागणार आहे. (हेही वाचा, Maharashtra MLC Governor’s Quota: राज्यपाल कोठ्यातून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या 'या' चेहऱ्यांना मिळू शकते विधानपरिषदेवर संधी)

महाविकासआघाडीतील चर्चेत असलेले चेहरे

शिवसेना :

सुनिल शिंदे (माजी आमदार) सचिन अहिर (माजी मंत्री) मिलिंद नार्वेकर(पक्ष सचिव) राहुल कनाल (युवा सेना), विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ), भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख, नाशिक), नितिन बानगुडे पाटील (उपनेते), अर्जुन खोतकर(माजी मंत्री)

राष्ट्रवादी काँग्रेस

एकनाथ खडसे (नुकताच पक्षप्रवेश), राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना), श्रीराम शेटे, आनंद शिंदे (गायक), उत्तमराव जानकर, आदिती नलावडे, शिवाजी गर्जे

काँग्रेस

सचिन सावंत (प्रवक्ते), सत्यजित तांबे (युवक काँग्रेस अध्यक्ष), मोहन जोशी, नसीम खान

दरम्यान, भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचीही राज्यपाल नियुक्त जागेसाठी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतू, खडसे यांच्या नावावर पुष्टी झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्यापपर्यंत तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे खडसे यांना विधानपरिषदेवर आमदारकी मिळणार किंवा कसे याबात उत्सुकता आहे.